सगळे सोडुनी देतिल हात
(चाल : विझले रत्नदीप नगरात..)
सगळे सोडुनि देतिल हात, तुजविण मागु कुणाला साथ ? ।।धृ0।।
परलोकांचा मार्ग दुजाला,नच ठावा गुरुवीण कुणाला ।
सारथि कोणि न परके येतिल, न्याया प्रभु सदनात ।।१।।
कासविस जव प्राण करिल हा, केविलवाणा तुला स्मरिल हा ।
तुकड्यादासा तुझा भरवसा, घेशिल ना पदरात ? ।।२।।
- पंढरपूर, दि. 0५-0१-९९५२