सतसंग जरी क्षण एक मिळे
(चाल: दो दिन के लिये मेहमान..)
सतसंग जरी क्षण एक मिळे, जिव पावन होइल हा अमुचा ।
कधि भाग्य घडे असले सहसा, उपदेश फळे हृदया तुमचा ।।धृ0।।
अम्हि चातक तव निजस्वरुपाचे, जे कळताची अज्ञान हरे ।
मी ब्रह्म असे निजतत्व पटे, जव अनुभव ये उपदेशाचा ।।१।।
हे विश्व अम्ही नटलो मिळुनी, जरि एकचि मुळचे ब्रह्म असू ।
तुकड्या म्हणे खेळ कळेल जया, तो धन्य म्हणावा सद्गुरुचा ।।२।।
- हैद्राबाद, दि. १४-0१-१९५५