सदा संतसेवेत वृत्ती जडू दे
(चाल: तेरे सहारे सुधर...)
सदा संतसेवेत वृत्ती जडू दे । घडू दे प्रभू ! एवढे हे घडू दे ।।धृ0।।
न जावो रिता एक क्षणही फुकाचा,
सदा चिंतनी मंत्र त्या श्रीगुरुचा ।
तयाच्या पदी देह अंती पडू दे । घडू दे प्रभू 0।।१।।
मुखी नाम करि काम जो रंजल्याचे,
चरणस्पर्श होवो मला चित्य त्याचे ।
तयाची चरणधूळ अंगी उडू दे । घडू दे प्रभू0।।२।।
सदा संत-वचनी असो भाव माझा ।
जरी प्राण जावो, न विसरो मी काजा ।
तुकड्या म्हणे दास होण्या रडू दे ! घडू दे प्रभू 0।।३।।
- परभणी, दि. १३-0१-१९५५