हृदयाच्या आसनि या, तुज बसवी मोहना !

(चाल: दिसला का कान्हा माझा..)
हृदयाच्या आसनी या, तुज बसवी मोहना !
पावन  हा  देह  व्हाया, सुखवाया   मन्मना ।।धू0।।
नंदादीप जिवा भावाचा, धूप उजळवी सत्कर्माचा ।
वत्तीचा धरुनी सुर ना, तुज   बसवी   मोहना ।।१।।
अनहत गजरे रंगवि वाणी, सोहं नादे गाउनि गाणी ।
स्मरणी हे नमवी शिर ना, तुज बसवी मोहना ।।२।।
संकल्पाचे पुष्प सगंधी,वाहुनि तुकड्या अविरत बंदी ।
उन्मनिचा धरूनी संग मना, तुज बसवी मोहना ।।३।।
                             - नागपूर-मार्ग, दि. 0६-११-१९५४