लागला रंग भजनाचा, डोलला देव आमुचा

(चाल: कुणी म्हणती स्वराज्य...)
लागला रंग भजनाचा, डोलला देव आमुचा ।।धृ0।।
या, बघा बघा रे ! कुणी, नाचतो देव रंगणी ।
ना पारचि आमंदाचा, डोलला देव  आमुचा ।।१।।
नेसला पितांबर कटी, भाळास दिसे   मळवटी ।
चमकतो हिरा मुकुटाचा, डोलला देव  आमुचा ।।२।।
तल्लीन होउनी भला, हा  देवपणा    विसरला ।
समजुनी भाव तुकड्याचा,डोलला देव आमुचा ।।३।।
                                   - हैद्राबाद, दि. १६-0१-९९५५