वनि मुकुंद दिसला साजणी !
( चाल सांगा मुकुंद कुणि हा..)
वनि मुकुंद दिसला साजणी ! वनि मुकुंद 0।।धृ0।।
पुष्पलतांनी भरले वन हे ! चाले पक्षियांची गोड धुन हे ।
गोपाळांचे तल्लिन मन हे, मज पाहुनि पडली मोहिनी ।।१।।
यमुनेचे पाणी सुंदर निर्मळ हे,कधि गंभीर कधि खळखळ वाहे ।
नाचति गोपाळांचे मेळे ! नानारंगि दिसे रासक्रिडा सारी
कोणी वाजवी ढोलतुतारी, गायीवत्सांनी भरली मेदिनी ।।२।।
कदंबवृक्षाच्या पडछायेखाली,शाम मनोहर ती मुर्ति अलबेली ।
हासत येतो हा वनमाळी, हाती घेवीनिया बासरीची पेरी ।
तुकड्यादासा आनंद झाला, त्या मुरलीची गोडधुन ऐकुनी ।।३।।
- गंगापूर, दि. 0९-0१-१९५५