तुझ्या ध्यानात कशी ही मोहनी
(चाल; सागा मुकुट कुणि हा..)
तुझ्या ध्यानात॑ कशी ही मोहनी, तझ्या ध्यासात ।।धृ0।।
आसन लावुनि बसलो होतो हो ! धूपदीपा लावुनि भावे
नेत्र लांवता प्रकाश पडला, जणूं आकाशी पडली चांदणी ।।१।।
हृदयासन तेजे दुमदुमले, ध्वनि कुठुनि तरी हा मधूर चाले ।
आनंद सगळा दाहि दिशांना हो! जणु लागली समाधी बोधे ।।
तुकड्यादासा निशा दाटली । गेली अखंड धुन ही लागुनी ।।२।।
ढाकेफळ, दि. १0-0१-१९५५