तुझी सुंदर वीणा, मोहवी या माना
(चाल: काहे जादू किया...)
तुझी सुंदर वीणा, मोहवी या मना,
पुन्हा वाजीवना, पुन्हा ।
श्रवणि पडता बळे, हृदयि शांति मिळे,
पुन्हा वाजीवना, पुन्हा 0।।धृ0।।
लता वृक्षा तळी, पाणियाची झळी,
स्थीर बसलो झणी, ध्यान ते लावुनी ।
स्फूर्ति उठली मनी, मधुर आला ध्वनी ।
गोड दिसल्या खुणा, पुन्हा वाजीवना हो ।।१।।
वीणा नव्हे बांसरी, भासली माधुरी,
अधरी धरली कुणी,पाहतो तुकड्या झणी ।
श्याम कांती वनी, चमके चंद्राहनी ।
वेधवी भावना, पुन्हा वाजीवना हो ।।२।।
- हैद्राबाह, दि. १५- 0१- १९५५