स्वच्छ करुया गाव सगळे

(चाल: आकळावा प्रेमभावे..)
स्वच्छ करुया गाव सगळे,या झणी हो या झणी ।।धृ0।।
घाण ही भरली   पुरी, सगळ्या   घरी  सडकेवरी ।
व्यवहारही मळला तसा,अति भेद पडलासे मनी ।।१।।
वाकडे हे घर कुणाचे, वाकडे वदणे कुणाचे ।
प्रेम   नाही   अंतरी, ही   काढुनि   सगळी   उणी  ।।२।।
व्यसनही     भरले   तसे, गांजा, मदीरा, चाहडी ।
दास  तुकड्या   सांगतो, राहू   न   देऊ   कैचणी ।।३।।
                             - वरखेड मार्ग, दि. 0१-0४-१९५४