कल्पना कशी तुज नाही ?

(चाल: कुणी म्हणती स्वराज्य...)
कल्पना कशी तुज नाही ? गावत माजली दुही।।धृ0।।
कुणी कुणा बोलेना धड । सारे करिति व्यर्थ बडबड ।
कोणि ना कुणाला ग्वाही । गावात माजली दुही ।।१।।
गावाच्या चहू बाजुनी । अति घाण पसरली जुनी ।
झाडिना कुणी उत्साही । गावात  माजली  दुही ।।२।।
ना मानपान राहिला ! मतमताचाचि गलबला ।
गरिबांची कदर ना काही । गावात माजली दुही ।।३।।
तू तरुण वाटतो सुदा ! पण काय तुझा फायदा ?
जा सुधर गाव लवलाही । गावात माजली दुही ।।४।।
तुकड्याचि ऐक बातमी । घे    सेवेसाठी   हमी ।
अता तरी सतत जा रही । गावात माजली दुही ।।५।।
                                 - जबलपूर, दि. 0३-१२-१९५४