तुझा जिव प्रीय तुज जैसा
(चाल: प्रभु ! हा खेळ दुनियेचा..)
तुझा जिव प्रीय तुज जैसा, तसा इतरास नाही का? ।।धृ0।।
तुला माडी हवी शहण्या, हवे मिष्टान्न तुज खाण्या ।
वस्र निटनेटके तुजसी, नको इतरास काही का ।।१।।
तुझे मुल गोड म्हणुनीया, शिकविशी आग्रहाने तू ?
दुजे मुल दूर लोटोनी, ग्राम सुखरुप राही का? ।।२।।
तुला धन मान जरुरीचे, दुजा नच हौस का त्यांची ।
म्हणे तुकड्या समज काही, पाठ शिकलास हाही का? ।।३।।
- वरखेड, दि. 0१-0४-१९५५