विठ्ठल विठ्ठल बोला, प्रीय भाविकांनो
(चाल; विठ्ठल तो आला आला...)
विठठुल विठ्ठल बोला, प्रिय भाविकांनो ।।धृ0।।
मुखे घेऊनिया नाम, अंगे करा नित्य काम ।
दयाभाव ठेवुनी चित्ती, सर्वाभुती राखा प्रेम ।।
त्याग करोनी विषयांचा, कामक्रोध दुर्व्यसनांचा ।
शरण चला साधूसंता, जिवा तारण्या बंधूंनो ।।१।।
पंथ पक्ष सारे विसरा, सर्व मिळुनि ग्रामा सुधरा ।
हाचि बोध संती केला, ग्रंथ मंथुनीया सारा ।।
धर्मनीति हेची सांगे सद्गुणासि बोधा अंगे ।
हाक कानि घ्या तुकड्याची, वारकऱ्यांनो ! सुजनांनो ।।२।।
- पंढरपूर मार्ग, दि. १0-0७-१९५४