रुचली का कुणाला गीता ? बोल हरि !
(चाल: मज रामसखा कुणि..)
रुचलि का कुणाला गीता ? बोल हरि ! ।।धृ0।।
किती कळली, किती वळली जगती ? सांग सांग भगवंता रे ! ।।१।।
रुचता जरि हा बोध जगाला, प्रसंग का हा येता रे ? ।।२।।
तू गेला अणि गेले सगळे, कसले सुख ते आता रे ! ।।३।।
निर्भयता यावी तू वदला, तेथे व्याली भिरूता रे ! ।।४।।
गुणविकास तूज प्रीय असे जरि, का चढली जातियता रे ! ।।५।।
तू वदसी, अभ्युदय व्हावा, दिसते निश्रेयसता रे ! ।।६।।
तुकड्यादास म्हणे माघारा, ये मग फिरुनी आता रे ! ।।७।।