हर हर बोलाना, बोलाना वीरांनो
(चाल: दुडु दुडु धावत ये..)
हर हर बोलाना, बोलाना वीरांनो
मराठीयांनो अणि तरुणांनो ।।धृ0।।
गेला छत्रपती शिवरायाही गेला ।
उडला महाराणा प्रताप तोही उडला ।।
तुम्ही तरी का राहता, का राहता बंधुनो ।
रे हिंदुनी, आर्य - सुतांनो ।।१।।
दिधले रक्त तुम्हा,काय काय मिळवाया ?
धर्मा स्थापाया, सत्य - न्याय रक्षाया ।।
स्वस्थचि का बसला, रामदास-पुत्रांनो !
वारकऱ्यांनो, विरशैवांनो ! ! ।।२।।
गर्जली महारांनी, झाशीची मर्दाची ।
सीतासती जैसी, चमकतसे घेदानी ।।
दिसले स्वप्न मला, प्रेमळ भाविकांनो !
श्रीमंतांनी ! या गरिबांनो ! ।।३।।
रक्षाना अपुल्या देव-देवता याला ।
लावा प्राणपणा, हक्क न द्या कोणाला ।।
तुकड्यादास म्हणे, नीती धैर्यधिरांनो ।
या गरीबांनो ! ऋषि-साधुंनो ! ! ।।४।।