झाला गर्क कसा व्यसनात ?
(चाल: विझले रत्नदीप नगरात...)
झाला गर्क कसा व्यसनात ?
ऊठ रे ऊठ तरूणा ! दे हात ।।धृ0।।
प्राणाविण जणु देह दिसावा ।
महाली जणु कधि दीप नसावा ।
तसेच झाले तुजविण जग हे, हर्ष नसे कोणात ।।१।।
सोडुनि दे ही आळस - निद्रा ।
हर्षभरे करि तव गुण - मुद्रा ।
तुकड्यादास म्हणे ऐकीना,सेवा-ध्वनि कर्णात ।।२।।