अमुच्या हृदयाला आवडले , गुरुकुंजाचे स्थान

(चाल: मै एक छोटासा बच्चा हूँ...)
अमुच्या हृदयाला आवडले, गुरुकुंजाचे स्थान
रमे जीवभाव गड्या ।।धृ0।।
भाव भक्तिने प्रात:काळी, सर्व मंडळी येती ।
दुमदुमले प्रार्थना स्थान हे, ब्राह्म मुहूर्त प्रभाती ।
घंटा मंजुळ नादे घुमतो, पक्षि करिती गुण-गान ।। रमे 0।।१।।
मधुर स्वराने गाती जन हे, लावुनि   स्वर   करताळी ।
गुरू-स्मरणाच्या स्मरण-चिंतनी, डुलते डाळी -डाळी ।
नांदे शांति मिळे, प्रेमही ते, इथे लाविता ध्यान ।। रमे 0।।२।।
सायंकाळी लखलखाट हा, निरांजनी  दिपकाचा ।
समुदायाने करिति प्रार्थना, विकास जिव भावाचा । 
रांगा सुंदर त्या, दिसताती, गूंजे सुमधुर गान रमे 0।।३।।
महाद्वारि    हरिपाठ   तुकोबा - ज्ञानोबाचा   गाती ।
तूकड्यादास ग्हणे नरनारी, तल्लिन होउनि जाती ।
या हो ! या सगळे,अनुभव घ्या,चुकवा दोष महान ।।रमे 0।।४।।
                                                      - सन १९६८