ही घ्याना कृपा सद्गुरुची
(चाल: ये देखो जला घर किसिका...)
ही ध्याना कृपा सद्गुरुची, आवराया दिकारे मनाची ।
सत्-संगती भक्ती मती, हिच रीती असे साधनाची ।।ध0।।
गुरुची कृपा ज्यास नाही, जीवनी शांति त्यांना न काही ।
अनुभवी असे बीलती साहसे, या प्रसादाची सेवा रुची ।।१।।
नेत्रांधळी व्यक्ति कोणी, मार्ग काढिल का-चोखळोनी ?
सांगा तरी साक्ष देण्या खरी, तैसी नीति असे साधनाची ।।२।।
श्रध्दा जयाची उफाळे, वृत्ती तयासीच ओळे !
तुकड्या म्हणे धन्य त्याचे जिणे, माळ तोडील तो वासनेची ।।३।।