सत्य - ज्ञानानं जिव उध्दरतो रे, भक्ति भावानं देव वश होतो

(चाल: चोरी करायला कशाला शिकला...)
सत्य- ज्ञानानं जिव उध्दरतो रे,भक्ति भावानं देव वश होतो ।।धृ0।।
कला-कौशल्यानं राजा देई मान, कांता मागे धन ।
सभा - पांडित्यानं॑  भूषदीतो  रे ।। भक्ति - भावानं0।।१।।
झत्रू जिंकावया, हवी कपट-माया,साध्य साधावया ।
साधेपणानी काम मनाशवितो रे ।। भक्ति-भावानं0।।२।।
मित्र जिंकावया, सत्य लागे तया, प्रेम पुत्रासिया ।
मन जिंकाया संयम लागतो रे ।। भक्ति - भावानं0 ।।३।।
राज्य जिंकावया, संघटन हाती घ्या, फौज लागे तया ।
न्याय लोकासी स्थिर बसवीतो रे ।।भक्ति-भावानं0।।४।।
दास तुकड्या म्हणे,जिंकाया वासने,दया गुरुची घेणे ।
ब्रह्मानंदी   वृत्ती   हसवीतो   रे ।। भक्ति - भावानं 0।।५।।