कोणी कुणास का म्हणा , आपुलेचि बघावे
(चाल: आवो सभी पिल जायके...)
कोणी कुणास का म्हणा, अपुलेचि बघावे ।
स्वत:चि आचरावे, हे स्पष्ट असावे ।।धृ0।।
बोलेल तसे वागे, तो थोर म्हणावा ।
सांगे परी न वागे, हा चोर म्हणावा ।
सर्वांमुखीच मंत्र असे, तंत्र घुसावे ।। स्वतःचि 0।।१।।
माणूस तो, कधी न जया क्षृद्र कल्पना ।
सर्वावरीच प्रेम करी, भव्य भावना ।
हा देश आमुचा म्हणूनि,नम्र दिसावे ।। स्वत:चि 0।।२।।
श्रम शक्तिचा विकास अता हो घरोघरी ।
लाजू नये कुणीही काम घ्यावया करी ।
सर्वास हो सुख शांती,हे पाठ म्हणावे ।।स्वत:चि 0।।३।।
सत्कर्म करुनी जो फळेचि मागिना कधी ।
तो आदरासी पात्र असे सांगू या जगी ।
तुकड्या म्हणे गणराज्य हे,ऐसेचि दिसावे ।। स्वत:चि 0।।४।।