जिवाभावानं जव मी पाहिलं
(चाल: जिवाभावानं सेवा...)
जिवाभावानं जव मी पाहिलं ।
माझं गावच मंदिर शोभलं ।।धृ0।।
विठ्ठल रखुमाई घरि- दारी ।
पुंडलिक हि मुले गोजिरी ।।
त्यांना सेवेचं फुल मी वाहिल ।। माझ 0।।१।।
उद्योगी जन सर्व पुजारी ।
पूजा तयांची इमानदारी ।।
आता खोटं नाट नाही राहिले ।। माझं 0।।२।।
व्यसनाधिन जे राक्षस होते ।
संघटनेने करुनी पालथे ।।
त्यांना प्रेमाचं अमृत पाजलं ।। माझं 0।।३।।
शिक्षण देऊनी केली दिवाळी ।
अज्ञानाची करुनी होळी ।।
तुकड्या म्हणे मन रंगल ।। माझं0 ।।४।।