तुझ्या स्वरुपी सदा आनंद
(चाल: नाम घेता तुझे गोविंद...)
तुझ्या स्वरुपी सदा आनद ।
अनुभवती संत स्वच्छंद ।।धृ0।।
गोविंद म्हणा गोविद ।
सगळेची चश हा छंद ।।
तोडोनी भेद भव द्वंद ।
अविस्मरणी कोंदला नाद।। तुझ्या0।।१।।
विषयाची वासना गेली ।
मोह माया भावना मेली ।।
ब्रह्मानंदी टाळी वाजली ।
आता उरला एक गोविंद ।। तुझ्या0।।२।।
नयनातूनी वाहती धारा ।
गहिवरला कंठ हा सारा ।।
रोमांच उठोनी शरीरा ।
तुकड्या म्हणे,सुखस्वानंद ।। तुझ्या0।।३।।