गड्या ! भावानं भक्तीनं बोलनाss गडया !

(चाल: चोरी करायला कशाला...)
गड्या ! भावानं भक्तीनं बोलनाss गड्या ! ।।धृ0।।
करतो कशाचा राग, आणतो अंगात  भांग,
सोडून गर्वाचा संग-
जरा    प्रेमाची   जबान   खोलना  ।।१।।
आम्ही आलो दुरुन, भारी कष्ट करुन,
तुमच्या  शेतावरुन ।
जेवढं पाहिजे ते पोटाला द्या ना? ।।२।।
कसतो आम्ही जपिन, तरि झालोसे दीन,
पान कपाळी तीन ।
हाहि बदलेल गरिबांचा काल ना ।।३।।
तुम्हि राहता सुखात, बिना कष्टांचे खात,
मजा मारता लोकात ।
हे     सारच   पुढे    भोगाल   ना ! ।।४।।
तुम्हि झाले मालक, भूमि-पति चालक,
परंपरेचा       हक्क ।
पुढे       काहीच    हे   राही    ना  ।।५।।
ऐका तुकड्याचा बोल, नका गमावू तोल,
वर्म समजा हे   खोल ।
नाहितर वाजेल सामोरा ढोल ना ।।६।।
                                       पंढरपूर , दि.२२-७-१९५३