सोड आता धामधुम, निघाली रामधुन
(चाल: गेली घडी पुन्हा नाही येणार...)
सोड आता धामधुम, निघाली रामधुन ।
चाल गड्या !, बघाया जाऊ रे ।।धृ0।।
झाडून-झुडून, सडा सारवण करुन,
रांगोळ्या भरुन, रंग लावु रे ।।१।।
घरोघरी तोरण, मार्गी चित्र ठेवून,
कसे करतात जन, जरा पाहु रे ।।२।।
कशी आली शोभा, जरा रहा उभा,
जागोजागी सभा, उत्साहु रे ।।३।।
जाती रांगेत जन, दिसे फोज दुरुन ।
तेथे रंगतसे मन, सुख घेऊ रे ।।४।।
देतो तुकड्या आदेश,नसे दुसरा लवलेश,
कसा उध्दारु देश, जरा गाऊं रे ।।५।।