सावध हो चल शेतकय्रा रे !
(चाल: कुणि कृष्ण पाहिला का माझा...)
सावध हो चल शेतकऱ्या रे !
आळस धरुनी बसला का? ।।धू0।।
देश तुझा हा स्वतंत्र झाला,
तुझाच तू राजा इथला ।
देशासाठी होई शिपायी, लोभासाठी रुसला का ?।।१।।
जातपात ही सार बाजुला;
म्हण मी हिंदी वीरगडी
पंथसंप्रदायांचा फासा,सोड सोड रे फसला का ?।।२।।
भारतभूमी गोपालांची,
मुळ रहिवासी तू इथला ।
उघड नेत्र राष्ट्राच्याकरिता,ये समोर तू फसला का?।।३।।
तुकड्यादास म्हणे ही संधी,
खोव॒ नको भोळ्या सुजना !
गांधीजीचे व्रत घे आता, गटागटांतुनि धसला का?।।४।।