अमुचा देश सुखाची खाण

(चाल; हमारा प्यारा हिंदुस्थान...)
अमुचा देश सुखाची खाण । यासी यश देवो भगवान ।।धृ0।।
धनधान्याने हो भरपुर हा । गोवंशाने हो सुंदर हा ।
वाढो शेति शक्ति खदान । यासी यश 0।।१।।
वीर तरुण हो सर्व शिपायी । तत्पर देशासाठि सदाही 
रक्षो राष्ट्रपित्याचे   दान । यासी यश 0 ।।२।।
राष्ट्रध्वज हा प्रीय तिरंगा । अखंड राही जैसी गंगा ।
वाढो सत्य-अहिंसा   मान । यासी यश 0।।३।।
हिंदराष्ट्र हे अखंड नांदो । अखिल विश्वही यासचि वंदो
सगळ्या धर्माचा जिवप्राण । यासी यश0।।४।।
जातीभेद मिटो हा सारा । मानवतेने हो अति प्यारा ।
तुकड्यादास करी गुणगान । यासी यश0।।५।।