भूमिदानाला देवोनि चालना, करु खेड्याची मिळोनी रचना ।

(चाल: भूमिदानाचं वेड कसं लागल !...)
भूमिदानाला देवोनि चालना, करु खेड्याची मिळोनी रचना ।।धृ0।।
ब्राह्मण-कुणबी कुठला, महार-चांभार कुठला, मानवधर्म अपुला ।
एक होवोनि पाळू या वचना ।। भूमि 0।।१।।
सारे कष्ट करु, हाती टिकास धरु, वाचे देवा स्मरु ।
राव-रंकांचा भेद नाही ठेवुना ।।भूमि0।।२।। 
आपण लोहार-सुतार, शिंपी-कुंभार-बेलदार, भंगी -वैद्य-वडार ।
अमुच्या गावात भिकारि राहिना ।। भूमि0।।३।।
मिटवू झगडा गावात, नाहि सरकारी बात,आमुचा न्याय आमच्यात ।
कोणि दुर्गृण राही-मजाल ना ! ।।भूमि 0।।४।।
आम्हि रस्ते सुधरु, विहिरि-संडास करू, रात्री जागली फिरू ।
करु गाबात समुदाय प्रार्थना ।। भूपि0 ।।५।।
युवका देऊ व्यायाम, सर्वा शिकवू हे काम, वाढवू गावाचे नाम ।
तुकड्या म्हणे होऊनि खुशालना।। भूमि 0।।६।।
                                      पंढरपुर, दि. २४-0७-१९५३