ऐकवत नाही, लोकांची गाऱ्हाणी ।
(चाल: अभंगाची )
ऐकवत नाही, लोकांची गाऱ्हाणी ।
केव्हा चक्रपाणी, लक्ष देशी ? ।।धृ०।।
अन्न नाही पोटी, हाती नाही पाणी ।
जगेल कशानी, जनता सारी ।।१।।
सुशिक्षिता नाही, उद्योग नोकरी ।
गरिबा मजुरी, पुरेचि ना ।।२।।
चिलेपिले देशी, कशासाठी बहू ।
सारे केतू राहू दुःख देती ।।३।।
संसाराचे झाले, नाटक सगळे ।
पसरले जाळे, पैसा पैसा ।।४।।
जनता करी पाप,कैसे त्या म्हणावे ।
कैसे मी जगावे, झाले तया ।।५।।
तुकड्यादास म्हणे,सुटला हा तोल ।
सत्ता झाली फोल, न्यायासाठी ।।६।।