श्रमिकांच भाग्य उघडलं, फळाया आलं -- पोवाडा

श्रमिकांच भाग्य उघडलं ,फळाला आलं,
झालं सुरू देशात भूमीदान,
जरा नाहि राहिल अता अनमान
पेटल चारी बाजुनी रान, होss जी0।।धृ0।।
जो कसेल त्याची जमीन, अशी ही म्हण,
झाली जग - जाहीर  जनतेत,
नाहि यासि उरला असा अंत,
घरोघर लोक हेच म्हणतात, होss जी0।।१।।
लाखोंनी दिलं भूदान, कराया मान,
भूमि.... मातेच्या कष्टिकांचा,
श्रमजिवी गरीब...    मजूरांचा,
होता मालकीहक्क ज्यांचा, होss जी0।।२।।
जे कुणी राहिले भूपती,ऐका विनंती,
मिळुनी द्या वाटूनिया भांडार,
कुणाची वाट आता   बघणार ?
नका करू आप-गर्जी व्यवहार,होss जी0।।३।।
रहा समान सगळेजण, भेद सोडून,
नका कुणि राहू इथे बेकार,
द्वेश अता नाही सहन करणार,
नाहीतर सर्व भुके मरणार, होss जी0।।४।।
सावकार-धनी-व्यापारी, कळेबाजारी,
मिळुनिया करा करा सुविचार,
बाचवा जनतेची जिवमान,
क्रांति ही अता नाहि अडणार, होss जी0।।५।।
तुकड्याची ऐका प्रार्थना, येऊ द्या मना,
करा देशाचा जिर्णोद्धार,
प्रभू तो आहे अर्ज घेणार,
विषमता नाहि त्यास खपणार, होss जी0।।६।।