चित्त वेडियलें पंढरीचे राये

चित्त वेढियले पंढरिच्या राये । 
सोडू नये पाय ऐसे वाटे ||धृ ||
कटावरी द्वय ठेवुनिया हात ।
 डोळिये पहात आम्हांकडे ||1||
टाकली मोहनी चित्त वेडे झाले । 
देह भांबावले गरुडापायी ||2||
वाटे पाय जड न्यावया माघारा। 
तुकड्या म्हणे वारा भरला देही ||3||