अगा रुख्मिणी रमणा

अगा रुख्मिणी रमणा  !  घ्यावी दिनाची करुणा ||धृ ||
दुखावलो भवं दुःखे  !  वाटे जहरा सारिखे  ||1||
आता नेघे  माझा जीव ! केली करू नये केव ||2||
तुकडयादास, दास झाला ! केले आपुले पावला ||3||