येईल का माझी दया नारायणा
येईल का माझी दया नारायणा !
कोण तुझ्याविणा धाव घेई ? ||धृ||
अभाग्याची नाव लुंगळे सागरी
कोण पैलपारी नेई तिला ? ||1||
मत्स्य मगरांचे भय भवधारी ।
काम क्रोध वैरी आड येती ||2||
तुकड्यादास म्हणे कृपा करा देवा !
अनंता केशवा ! दीनावरी ||3||