सांगणे हे वाटे जिवा लाजिरवाणे
सांगणे हे वाटे जिवा लाजिरबाणे ।
पाहिजे देवाने कृपा केली ।॥
काय आमुच्याने होईल केशवा !
कैसा लावू दिवा अंधारी या ? ॥
चित्त विषयासी सेबु पाहे सदा ।
अजुनिया गधा राहिलो मी ।
तुकड्यादास म्हणे तारा पतीतासी ।
माझिया मानसी चीड आली ।॥