कोण संग मज लाभेल श्रीहरी
कोण संग मज लाभेल श्रीहरी ।
जातांना अंधारी मार्गा ऐशा ।
घरोनिया हाती कोण नेई मज ? ।
यात्रा ही सहज होय जेणे ।
लागती ठोकरा क्षणोक्षणी पडो ।
काम क्रोधे रडो मार्गा ऐशा ।।
तुकड्यादास म्हणे पाठवा निशाण ।
धर्म ओळखोन चालो आप्ही ॥