विसरु नका प्रभु-नामा, गडे ! हो
विसरु नका प्रभु-नामा, गडे ! हो ॥॥धृ०।।
भव-सागरि वाहता भय भारी, देइल तोचि विरामा ।।१॥।।
गणगोतादिक, मित्र, सहोदर, कोणि न येतिल कामा।1२॥।
सांगुनि गेले संत वचन हे, ठावुक तुम्हा, आम्हा ।।३॥।
तुकड्यादास म्हणे निर्भय व्हा, मिळवा प्रभु-पद-प्रेमा ।।1४ ।।