कोण होय उतराई गुरु प्रसादाच्या ठायी

कोण होय उतराई । गुरु प्रसादाच्या ठायी
कोटी कोटी जन्म घेता । न फिटे उपकार सर्वथा ।
कोटी मायबापासम । एक सद्गुरु-विश्राम ।
दास तुकड्या तो म्हणे । गुरु-भक्त वर्म जाणे ॥