अंधारात दिवा दाखविला आम्हा
अंधारात दिवा दाखविला आम्हा ।
बहुतांच्या कामा संत आले ।।
तयांचा उपकार फेडिता फिटेना ।
केलियाही नाना सेवा त्यांची ॥
काय उतराई व्हावे जीवप्राणे !
ब्रह्मरस जेणे जेवविले ॥
तुकड्यादास म्हणे धन्य धन्य गुरु ।
मोक्षाचा विचारु सुगम केला ॥