किती करू भक्ती सांगा विठ्ठलाची
किती करू भक्ती सांगा विठ्ठलाची
अजुनिया नाही नाही,
झाली भेटी त्याची ॥धृ॥
जिव उतावीळ वाट पाहता पाहताची,
आता नाही उरली शक्ती, किती करू ॥१॥
मन झाले वेड ,वेडे पिसे बावरे, भिरी भिरी चोहीकडे, देवासेची पाहू गेले
कुणीतरी सांगा युक्ती, किती करू ॥२॥
आता शेवटी हा कंठ दाटूनीया आला, रोमांचले देह सारे नेञी पुर साठवला तुकडयाची घ्याया स्फूर्ती, किती करू ॥३॥