कळते उगा कशाला म्हणसी
कळते उगा कशाला म्हणसी ।|धृ०।।
वरिवरि ऐकुनि शास्त्र-पुराणे, थोर मनाशी गणसी ।।१॥।
कळले असते ज्ञान तुला जरि,विषयी का सणसणसी ?।।२॥।।
केवळ भ्रम हा विषय-सुखाचा,सदा मनी गुणगुणसी ।।३।।
. तुकड्यादास म्हणे कळतेपणि, तूच तसा मग बनशी ।।४॥।।