सुखकर हरी गुण गाई मनुजा
सुखकर हरि - गुण गाई, मनुजा ! ।।धृ।।
नरदेहाची सुंदर वेळा,
साधुनि घे लवलाही । मनुजा!।।१।।
नाहि भरवसा पळ प्राणाचा,
कधि यमराजा नेई । मनुजा! ।।२।।
किति तरि गेले देह सोडुनी,
साथि न कवडी येई । मनुजा ।।३।।
तुकड्यादास म्हणे हरि स्मरणे,
तरशिल भवभयडोही । मनुजा ! ।।४।।