सावळा सुंदर अयोध्येचा राजा
सांबळा सुंदर अयोध्येचा राजा नमस्कार
माझा तया कोटी ||धृ ||
सत्वगुण-मुर्ति अवतार रामाचा ।
कैवारी भक्तांचा जिवे भावे ||1||
भक्ताचियेसाठीं धरिला अवतार ।
काननीं साचार प्रवेशला ||2||
तुकड्यादास म्हणे मदनांचा पुतळा ।
संहारी कळिकाळा ऋषीस्तव ||3||