आता संभाळाया आम्हा तुजविण कोण रामा

आता सांभाळाया आम्हा । तुजविण कोण रामा ! ॥
धरा हाती धनुष्यबाण । वळवा माझे दुष्ट मन ॥
तोड़ा विषयांची संगती । लावा सज्जनांच्या पंथी ॥
तुकड्यादास म्हणे आणा ! मना माझी ही प्रार्थना ॥