अभाग्यासी काही घडेल कि काय

अभाग्यासि कांहीं घडेल की काय ? 
चिंतना ही खाय मनामाजी ||धृ ||
करावे ते होते उफराटे सदा । 
काय या गोविंदा वाटे नेणो ||1||
इच्छा राहे एक घड़तसे एक । 
होते जाते एक सदा काळी ||2||
तुकड्यादास म्हणे सुचेना या जिवा ।
काय या केशवा मनी आहे ||3||