अमुचिया हाती काय तू दिलेसी
आमुचिया हाती काय तू दिलेसी ।
सांग हषिकेशी ! सत्य आम्हा ||धृ ||
जन्म होता क्षणी मृत्यु तू लिहिला ।
भविष्ये कथिला निशचयेशी ||1||
सुख दुःख भोग पाप पुण्य सारे ।
सांगती निर्धारे भविष्याने ||2||
तुकड्यादास म्हणे येतो अनुभव ।
तुझा सर्व डाव खेळियाचा ||3||