उघडा हे दार आम्ही आलो पाया

उघडा हे दार आम्ही आलो पाया । 
नका पंढरिराया ! दूर लोटू ||धृ ||
बाहेरील श्वान ओरडती जोरे । 
चावतील वारे ! अंगालागी ||1||
अंधारिया रात्री दुजा कोणी नाही । 
मारिता हाकही कोण ऐकी ? ||2||
तुकक्यादास म्हणे मज घ्याहो आंत । 
घरूनिया हात ओढा तुम्ही ||3||