आलासे कंटाळा पाहताना जगा

आलासे कंटाळा पाहतांना जगा । 
जरा नाही सगा यात कोणी ||धृ ||
स्वार्थ-साधु सर्व दिसती सोयरे
ग्रासिले विचारे वासनेने ||1||
ऐहीक जगाचा करितां विचार । 
कळले साचार सुख नाही ||2||
तुकड्यादास म्हणे सुख आहे संतीं । 
तेथे माझी मती फिरवी देवा! ||3||