घडो वेळो वेळा सेवा संतांची

घड़ो वेळोवेळा सेवा या संतांची । 
तेथेचि मनाची घाव वाढ़ो ||धृ ||
विटो सर्व मन संसार भोगता । 
जळो ही अहंता देह-बुद्धी ||1||
प्राप्त होवो ज्ञान उपासना कर्म । 
धर्माचेही वर्म  जाणो सर्व ||2||
तुकड्यादास म्हणे होवो गुरुकृपा । 
मार्ग लाभो सोपा मोक्षपंथी ||3||