जगी कोना काही आवडे

जगी कोणा कांही आवडे आणीक । 
आम्ही  मागो एक हेचि देवा ||धृ ||
देव प्रसन्नवोनि घ्यावा आशिर्वाद ।
तुटो हा आनंद विषयांचा ||1||
इंद्रियांचे सुख दुरावो मानसी ।
चित्त देवापाशी राहो सदा  ||2||
तुकड्यादास म्हणे रडणे हे आहे । 
प्रभु बापमाय ! पुरवी आस ||3||