तुझिया शब्दाचे बाण लागे उरा

तुझिया शब्दांचे बाण लागे उरा । 
हृदय पाझरा सोडू लागे ॥
अंगीं येति हाल घुमारियापरी ।
विसरे बाहेरी देह-भाव ॥
कोसळे नेत्रांचे मार्गे पाणियाने
हृदय द्रवाने भरती वाढे ।।
तुकड्यादास म्हणे ऐसी राहो घडी । 
मन हे न सोडी तया प्रेमा ।।