संकोचले मनी मन अंतरंगी
संकोचले मनीं मन अंतरंगी ।
जावया कुसंगी संसाराच्या ||धृ ||
तया वाटे, देव पहावा आवडी ।
वहाव्या कावडी संताचिया ||1||
हरिकथा नामसंकीर्तन सदा ।
आळवू गोविंदा ऐसे झाले ||2||
तुकड्यादास म्हणे वृत्ति नये मागे ।
उन्मत या रंगे राहो नित्य ||3||