गोंधळले चित्त न दिसें आम्हांसी
गोंधळले चिंत्त न दिसे आम्हासी ।
पहाया प्रभूसी करू कैसे ? ||धृ ||
मार्ग सापडेना संतही दिसेना
विपय वासना त्रास देती ||1||
नाही एक भाव कोणा शरण जाऊ ।
कैसियाने पावू केशवराजा? ||2||
तुकड्यादास म्हणे देवासी करुणा ।
येईल कां मना दीनाची ती ||3||